ओवाळू आरती तुजला श्रीकृष्ण प्रेम दे मजला।। तुझी अगाध अनुपम लीला विख्यात असे जगताला वर्णीता शेष ही श्रमला नीती नीतीची म्हणती तुजला श्रीकृष्ण प्रेम दे मजला।।1।। जरी असशी निर्गुण थोर तुझा युगे युगे अवतार घेतोसी परात्पर जिवा लागी त्रासिशी तुजला।।2।। तू द्वादश अग्नी गिळीला बोटावर गोवर्धन उचलला कंस chanur ठार ची केला ब्रह्मदीक शरण हो तुजला।।3।। भारतीय महा युद्धाला प्रवृत्त केले पार्थाला बोधूनी भगवद्गीता ला प्रेम दास वंदितो तुजला।।4।।
जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, पांडुरंगा गाव तुझं माहित नाही रे मला वाटते माझा तू रे, पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे कैसे तुझं आळवू ,पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा माहीत नाही रे पांडुरंगा ।।1।। श्रुती सांगती देव आहे, गीता भागवतात तसाच माझा देव आहे पंढरपुरात भावाचा तो कागद, भक्तीची ती लेखणी मनाचा तो टप्पेखाना,टप्पेखाना बुद्धी चा तो पोस्टमन, त्याचे हाती पत्र धाडीते पांडुरंगा ।।2।। संत मंडळी पत्र धाडीती पंढरपुराला पत्र वाचूनी आनंद, झाला पांडुरंगाला साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाला तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला एवढे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या देवराया रे पांडुरंगा भक्त लागे पाया रे।।3।। जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला पत्ता तुझा ठाऊक झाला रे पांडुरंगा ठाव तुझा माहीत झाला रे
पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पालखी सजली , माऊली रथात निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलीचे आगमन मुखी विठुचा गजर सारी वैष्णव आनंदली।।1।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र देहू हुन झाले तुकोबा चे आगमन ज्ञानोबा तुकाराम भजनाने सारी पंढरी दुमदुमली।।2।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र हुन नाशिक हुन माऊली गुरू निवृत्ती नाथ पंढरीच्या दर्शनाला नाथ पंथी निघाले।।3।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण मुक्ताई पालखी आली लांब गावाहून चांगदेव शिष्य झाला गुरू भगिनी माऊली।।4।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र हुन सासवड हुन माऊली बंधू सोपान धन्य धन्य ही पंढरी ब्रह्मनंदी टाळी झाली।।5।। स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी
Comments
Post a Comment