संत जनाबाई अभंग, पीठ शेल्याला लागले lyrics,जनीची वाकळ,विठ्ठल भजन

संत जनाबाई अभंग


पिठ शेल्याला लागले,
झाला राऊळी गोंधळ
कुण्या घरचे दळण,
आला दळुन विठ्ठल।।धृ।।

पीठ चाखले एकाने, 
म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुज्याने,
म्हणे सुगंधी कापुर।।2।।

कुणी शेला झटकला,
पीठ उडुन जाईना
बुचकळला पाण्यात, 
पीठ धुऊन जाईना।।3।।

झाली संचित पंढरी, 
वाढे  राऊळी वर्दळ
ठिगळाच्या पांघरुणा, 
शेला म्हणती सकळ।।4।।

फक्त जनीस दिसते,
होती तिची ती वाकळ
विठ्ठलप्रेमे भरुन आले,
जनी रडे घळघळ।।5।।

 संत जनाबाईला  दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकुन  तिची वाकळ घेवुन जातो.

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics