साठीतला संसार
साठीतला संसार
रंग त्याचा वेगळा
रचना--डॉ सौ अनघा कुलकर्णी
पण तरीही दोघे खुश असतात
स्वतः च्या विश्वात गुंग असतात
तो जुन्या मित्रात रमतो
ती मात्र नातवंडाशी मैत्री करते
ती लहान होत जाते, बालिश पणे वागते
तो मोठा होत रहातो, गंभीरपणे जीवन जगतो
लहान व मोठेपणा यांची ही संगत
जीवनाची वाढवते रंगत
कोरोना येतो, सर्वांना घरात बसवतो
अचानक ती कर्ती होते,सर्व आघाड्या सांभाळू लागते
तो मात्र
फक्त news चॅनेल लावून कोरोनाचे संकट अनुभवू लागतो
ती मात्र हसत खेळत संसारात बुडून जाते,
जागतिक संकटापेक्षा नाश्ता जेवण, धुणी भांडी यात रमून जाते
तो चिंता करतो आणि ती मात्र संसार करते,
कारण तो मोठा असतो आणि ती भातुकली त च असते
Comments
Post a Comment