जिवतीची आरती,श्रावण शुक्रवार आरती

जिवतीची आरती,देवीची आरती,श्रावण शुक्रवार आरती

जयदेवी जयदेवी 
जय जिवती जननी 
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी ॥ धृ ॥

श्रावण शुक्रवारी आणूं प्रतिमा 
घरात स्थापूनी करु पूजना 
आघाडा दूर्वा माळा वाहूं या 
अक्षता वाहूनी कहाणी सांगू या  1


पुरणपोळीचा नैवेद् करू 
सुवासिनींना भोजन घालू 
चणे हळद कुंकू दूधही देऊ
जमुनी आनंदे आरती गाऊ 2


सटवीची बाधा होतसे बाळांना 
सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना 
यासाठी तुजला करिती प्रार्थना 
पूर्ण ही करी मनोकामना 3

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics