हात धुवा तोंड झाका मास्कात,कोरोना आलाय ,
हात धुवा तोंड झाका मास्कात
कोरोना आलाय गल्लीत आपल्या दारात सावधान
येईल घरात।।
रचना- डॉ अनघा कुलकर्णी
सुरू झाल्यात ऑनलाइन शाळा
वेळ पुरेना आई व बाळा
नेट संपून जाई, नेत्र खराब होई
काळजी वाढली या मुलांच्या डोळ्यांची ।।1।।
आषाढ सम्पून श्रावण सुरू झाला
कोणी जाईना हो देवळाला
साथ पसरू लागे, भीती वाढू लागे
म्हणून सांगते
गर्दी सर्दी टाळा ।।2।।
घरचे गरम अन्न तुम्ही खावा
ध्यान धारणा योग अंगी बाणवा
लवंग तोंडात धरा
सुंठ मिरे काढा करा
ब्रेक करून चेन हरवा कोरोनाला।।3।।
हात धुवा मास्क लावा नाका तोंडाला
कोरोना आलाय गावाला आपल्या दाराला
Comments
Post a Comment