वांगे औषधी उपयोग,eggplant health benefits

वांग्याचे भरीत औषधी गुणांनी युक्त
 वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन,  इत्यादी समस्या दूर होतात. 

वांग्याचे खाण्याचे फायदे…
खोकला ठीक होतो –
वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.

भूक शांत होते –
वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होऊ शकते.

वजन कमी होते –
जेवणापूर्वी अर्ध्याकच्च्या वांग्यासोबत सलाड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास हळू-हळू वजन कमी होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते –
 वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.  या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो 

शांत झोप लागते –
भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मीठ टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते.  रक्ताची कमतरता दूर होते.
अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते –
वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन इ. समस्या दूर होण्यास मदत होते.

डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर –
वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते आणि यामधील कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे विरघळत नाहीत. यामुळे टाइप 2 डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर