जनाबाई भजन अभंग
संत जनाबाई अभंग,
संत कबीर आणि नामदेवांच्या माना डोलू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवऱ्या
बोलू लागल्या ।।धृ।।
एक चोरटी आपलंच गाऱ्हाणं मांडाया लागली
जनाबाईच्या गवऱ्या चोरुनी भांडाया लागली
भावभक्ती च्या फुल पाकळ्या
जेव्हा फुलू लागल्या 2
विठ्ठल विठ्ठल ।।1।।
महती ऐकुनी जनाबाई ला
भेटाया ला आले
दृश्य पाहुनी संत कबीर
आश्चर्य चकीत झाले
चोरी करणाऱ्या बाई त्या
मार्गी चालू लागल्या2
विठ्ठल विठ्ठल ।।2।।
चोरलेल्या गवऱ्या नाही मी जनाबाई बोलली
कबीराने त्या एकेक गवरी कानाला लावली
विठ्ठल विठ्ठल ध्वनी निनादे
गवऱ्या बोलू लागल्या2
विठ्ठल विठ्ठल ।।3।।
धन्य धन्य माऊली खरी तू संत कबीर बोलले
लोटांगण घालुनी चरणी डोलाया लागले
सोपानदाच्या भक्तीच्या भावना खुलु लागल्या2
विठ्ठल विठ्ठल ।।4।।
Comments
Post a Comment