श्री जिवतीची आरती|श्रावण शुक्रवार जिवतीची आरती


श्री जिवतीची आरती
श्रावण शुक्रवार जिवतीची आरती

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी 
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी ॥ धृ. ॥

श्रावण येतांची आणूं प्रतिमा 
गृहांत स्थापूनी करुं पूजना 
आघाडा दूर्वा माळा वाहूं या 
अक्षता घेऊनी कहाणी सांगू या ॥ १ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी 
सुखी ठेवी संतति विनंती
तव चरणी 

पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळदिकुंकू दूधही देऊं ।
जमुनी आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी 
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी 

सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी 

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी 
सुखी ठेवी संतति विनंति
तव चरणी


Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर