श्री लक्ष्मी नृसिंह जयंती| shri lakshmi nrusinh aarati bhajan| श्री नृसिंह पाळणा

श्री लक्ष्मी नरसिंह जयंती
श्री लक्ष्मी नरसिंह प्रकट दिन

हिरण्यकश्यपू राक्षस राजा
भावाच्या मृत्यूचा बदला घेण्या
ब्रम्हा शिवाची केली तपस्या
मिळविण्या वरदान १

दोन्ही देव ही झाले प्रसन्न
अजेय अमरत्वचे दिले वरदान
राक्षस राजाला झाला उन्माद
अत्याचारा ने प्रजा भयमान
देव ही झाले विषण्ण 2

पत्नी कयाधू ने जन्म दिला
राक्षस कुळात प्रल्हाद आला
तोड नसे त्याच्या हरी भक्तीला
नारायण नारायण जप हा घुमला
राक्षस राज्यात 3

राक्षस पित्याने प्रल्हादासी
छळीयले बहू मन वळविण्यासी
कढईत टाकले, फेकले कड्याशी
नारायण नारायण म्हणुनी प्रल्हादे
विष पचविले 4

पिता राक्षस क्रौर्यवान
पुत्र प्रल्हाद भक्तीवान
हरिनामाचा करी सन्मान
नारायण नारायण 5

एके दिवशी सायंकाली
पिता राक्षस क्रोधाने भारी
नारायण दाखव या खांबावरी
उन्मत्त पणे लाथ मारी
प्रल्हाद हरिसी हाक मारी
नारायण नारायण 6

अक्राळविक्राळ नरसिंह
प्रकटे नारायण खांबातून
हिरण्यकश्यपू स उचलून
मांडीवर आडवा पाडून
तीक्ष्ण नखांनी पोट फाडून
संपविले दैत्याला 7

श्री लक्ष्मी नरसिंह अवतार
प्रकट झाला
प्रल्हादाची भक्ती बघूनी
नारायण प्रसन्न झाला
नारायण नारायण जप हा
जपता नारायण आला
श्री लक्ष्मी नरसिंह अवतार
प्रकट झाला

स्वर रचना --डॉ सौ अनघा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर