बाळ शिवाजी पाळणा, shivaji maharaj palana

बाळ शिवाजीचा पाळणा,

रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी
https://youtu.be/2sUtGnDVX94

सह्याद्रीचा सिंह जन्मला,
पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजी चा
जो जो रे बाळा जो जो रे

रायगडावर तुम्ही उभारली
शिव राष्ट्राची गुढी
हर हर महादेव घुमली गर्जना
गड किल्ल्यांच्या तटी
तुम्हा मुळे तर आम्ही पाहतो
देवळांचे कळस
तुम्ही नसता तर दिसली नसती
अंगणात ही तुळस
जो जो रे बाळा जो जो रे

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजी चा
जो जो रे बाळा जो जो रे

गाली तीट लावून बाळा
काजळ घाला डोळा
कुंची अंगड घालून त्याच्या
पायी घुंगुर वाळा
लिंब लोण उतरा ग लवकर
दृष्ट लागेल बाळा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

कौसल्येचा राम जसा हा
पुत्र जिजाऊ चा

झुलवा पाळणा
जो जो रे बाळा जो जो रे

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर