COVID 19 Lockdown नंतर घराची स्वच्छता व काळजी कशी घ्यावी
COVID 19 -Lockdown संपल्यावर घराची काळजी कशी घ्यावी.
-डॉ सौ अनघा कुलकर्णी
1 हात वरचेवर स्वच्छ धुवा ,
घरगुती मास्क वापरा,
घरातील प्रत्येक व्यक्तीचा मास्क वेगवेगळ्या रंगाचा असावा जेणेकरून एकमेकांचा मास्क वापरला जाणार नाही,मास्क दररोज धुवून उन्हात वाळवा
2 नेहेमी घरात लागणाऱ्या वस्तू बाहेर ठेवा.नेहेमी न लागणारे कपडे ,भांडी, पुस्तके ,खेळणी ,शो च्या वस्तू इ इ बांधून loft वर ठेवा.
3 ज्या ज्या ठिकाणी बाहेरून आल्या आल्या स्पर्श होतो अश्या वस्तू सारख्या निर्जंतुक करा
दरवाजे, कड्या,कुलूप,किल्ल्या,फोन, रिमोट,मोबाईल फोन, खुर्च्या ,टेबले, light ,बटणे, नळ, tv ,vehicle हँडल, चप्पल स्टँड इ इ
4 घर स्वच्छ करतांना gloves वापरा ते गरम पाण्यात धुवून उन्हात वाळवा
Disposable gloves व disposable masks वापरू नका त्याने कचऱ्याचा प्रॉब्लेम होईल
5 घरात हवा व सूर्यप्रकाश येईल यासाठी दारे खिडक्या उघडा त्यामुळे रोगजंतूंचा नायनाट होण्यास मदत होते
6 कपडे मशीन ला लावा वाळवा व उन्हात वाळवा, कपडे धुताना डिटर्जंट पावडर सोबत थोडी ब्लिचिंग पावडर टाका, रंगीत कपडे वेगळे ठेवा
7 प्रत्येकाचा साबण कंगवा टॉवेल वेगळा असावा
8 घरात केर फरशी करताना केवळ सुगंधी फिनेल न वापरता त्यात तुरटी ब्लिचिंग पावडर मीठ मिक्स करा
9 बाहेरून आल्यावर पाय हात तर धुवाच पण चप्पल बूट धुवायची सवय करून घ्या, चप्पल स्टँड ही निर्जंतुक करावे दररोज
10 महत्वाचे तुमचे पैशाचे पाकीट ज्यात तुम्ही atm कार्ड नोटा ठेवता ते एका प्लास्टिक कव्हर मध्ये ठेवा म्हणजे निर्जंतुक करता येईल व आठवणीने कपडे धुवायला टाकताना पाकीट काढून ठेवा
11 घरात कामासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना हात निर्जंतुक करून काम करण्यास सांगावे तसेच घरातही व बाहेर ही त्यांना मास्क वापराने आवश्यक आहे
12 वृद्ध म्हाताऱ्या व्यक्तींना त्यांची आधाराची काठी, चष्मा निर्जंतुक ठेवण्यास सांगावे , नियमित औषध व आहाराची काळजी घ्यावी
13 news paper आल्या आल्या न वाचता उन्हात ठेवून दुपारी वाचवा.
काही देशात प्लास्टिक कव्हर मधून news paper येतो, त्यामुळे तो sanitizer ने निर्जंतुक करता येतो,
14 वस्तू भाजी खरेदी करताना सुट्टे पैसे द्यावेत त्यामुळे दुकानदारांकडून आपल्याला पुन्हा पैसे घ्यावे लागणार नाहीत, डिजिटल व्यवहारावर भर द्यावा
15 घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांची स्वच्छता ठेवावी व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी
#happy and healthy life at home
#health novel
#https//dranaghakulkarni.blogspot.com
https://youtu.be/0TB6Me9yGiw

https://youtu.be/0TB6Me9yGiw

Very nice and informative guidance.Thanks.
ReplyDelete