श्री दत्तगुरु पालखी स्तवन, नृसिंहवाडी

श्री दत्तगुरु पालखी स्तवन, नरसोबाची वाडी
https://youtu.be/OvtB3dcd8BE

कवण येऊनी कुरुंदवाडी,
स्वामी ते मिळवावे,
सांगावे, कवणा ठायी जावे,
कवणा ते स्मरावे
कैसे काय करावे
कवण्यापरी मी राहावे 1

कवण येऊनी कुरुंदवाडी
स्वामी ते मिळवावे

या हारी, जेवावे व्यवहारी
बोलावे संसारी
घालुनी अंगिकारी
प्रतिपाळीसी जो निर्धारी 2

केला जो निज निश्चय स्वामी
कोठे तो अवधारी

या रानी
माझी करुणा वाणी
काया कष्टी प्राणी
ऐकून घेशील कानी
देशील सौख्य निधानी 3

संकटी होऊनी, मूर्च्छित असता,
पाजील कवणा पाणी

त्या वेळा
सत्पुरुषांचा मेळा
पाहतसे निज डोळा
लाविसी भस्म कपाळा
सांडी भव तू बाळा 4

श्रीपाद श्री वल्लभ म्हणती
अभय तुज गोपाळा

सांगावे
कवणा ठाया जावे
कवणा ते स्मरावे
कैसे काय करावे
कवण्यापरी मी रहावे 5

कवण येऊनी कुरुंदवाडी
स्वामी ते मिळवावे

सांगावे
कवणा ठाया जावे
कवणा ते स्मरावे
कैसे काय करावे
कवण्यापरी मी रहावे

श्री दत्तगुरु चरणी अर्पण

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर